Amrut Patre (अमृत पत्रे)

From The Sannyas Wiki
Jump to navigation Jump to search


श्री रजनीश यांची जीवनदॄष्टी जगाने पत्करली तरच ज्ञानेश्वर महाराजांचा आशावाद प्रत्यक्षात अवतरेल - ’दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात’ - श्री गोपीनाथ तळवलकर, पुणे श्री रजनीश हे युगायुगात चालत आलेल्या तेजस्वी तपस्येचे सर्वपरिपूर्ण, सर्वतंत्र, स्वतंत्र, सुगंधी ज्ञानकमळ आहे. त्यांचे यच्चयावत अफाट वाडमय ’अंतरंग दिठी’ ने वाचल्याविना हे ध्यानीही येणार नाही. हे सारे वाडमय पाहिले की एवढेच म्हणावे वाटते की श्री रजनीश म्हणजे ’प्रज्ञापॄथ्वीचा रावो’ आहे... प्रा. कॄष्ण गुरव संपादक, ’पैलतीर’, पश्यंति - प्रकाशन, कोल्हापूर. श्री रजनीश प्रेमाने दुथडी भरून वाहात आहेत. आणि हे प्रेम लहानथोर सर्वांना वाटून टाकीत आहेत. ते प्रेम संपतच नाही मुळी. ते सतत वाढते आहे. या प्रेमाच्या वर्षवात अनेक अतृप्त आत्मे भिजून चिंब होत आहेत, आणि आपल्या दु:खातून, यातनेतून, आणि असमाधानातून बाहेर पडण्याचा मार्ग प्राप्त करून घेत आहेत. - साध्वी योग शिरीष (शिरिष पै), मुंबई. हजारो लोकांना आत्मप्राप्तीचा खराखुरा, डायरेक्ट, धडधडीत मार्ग श्री रजनीश दाखवित आहेत. अक्षरश: हात धरून अनुभवापर्यंत पोचवित आहेत. केवळ चित्तचक्षु चम्त्कारिक बुद्धिविलास म्हणजे खरा धर्म नव्हे तर IMMEDIATE REALIZATION म्हणजे धर्म होय. इथे उधारीची बात नाही, सुमुहूर्ताचे हवाले नाहीत. NOW AND HERE... - स्वामी धर्मव्रत (श्री. श्याम कुलकर्णी) लेखक, नाटककार, ’संगीत अलंकार’, ठाणे, मुंबई.
translated from
Hindi:
notes
time period of Osho's original talks/writings
(unknown)
number of discourses/chapters


editions

अमृत पत्रे

Year of publication : 1971**
Publisher : Jivan Jagruti Kendra
Edition no. :
ISBN
Number of pages : 170
Hardcover / Paperback / Ebook : P
Edition notes :
back cover